Ad will apear here
Next
सोलापुरात धुक्याची चादर
पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग


सोलापूर :
कडाक्याच्या थंडीत हिरवाईने दाट धुक्याची चादर पांघरल्याचा अद्भुत आविष्कार १९ डिसेंबर २०१८ रोजी सोलापूर जिल्ह्यात पाहायला मिळाला. तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरले होते. त्यात वारेही वाहत होते. धुक्यामुळे द्राक्षबागांचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत.



सोलापूर जिल्ह्यात सध्या कडाक्याची थंडी पडत असून, दाट धुकेही पडू लागले आहे. या धुक्यामुळे अगदी पावलाच्या अंतरातीलही काही दिसत नव्हते. त्यामुळे वाहनचालकांना सकाळी नऊ वाजेपर्यंत दिवे लावूनच वाहन चालवावे लागत होते. पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत धुके टिकून राहिल्यामुळे महाबळेश्वर व माथेरानचा ‘फील’ मिळाला; मात्र शेतीसाठी हे धुके धोकादायक आहे. दाट धुके पडल्यामुळे फळबागा व फळभाज्यांच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. धुक्यातील पाणी आणि त्यानंतर पडलेल्या उन्हामुळे द्राक्षबागेत घडकूज होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. तसेच डाळिंब बागेतही फळांवर डांबऱ्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या फळबागा व फळभाज्यांची पिके वाचवण्यासाठी धडपड करू लागले आहेत. 



मेंढापूर येथील शेतकरी उमेश यादव म्हणाले, ‘दाट धुक्यामुळे द्राक्षबागांमध्ये घडकूज होण्याचा मोठा धोका असल्यामुळे आम्ही आमच्या बागेत सल्फरचे डस्टिंग करून बागेत पहाटेच शेकोट्या पेटवून धूर करून बागेचे नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला.’

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZORBV
Similar Posts
ओसाड माळरानावर फुलवली द्राक्षबाग सोलापूर : रावसाहेब मारुती गाढवे या तरुण शेतकऱ्याने कातळावर द्राक्षबाग फुलवण्याची किमया केली आहे. सोलापूर-सांगली जिल्ह्याच्या सीमेवर कातळ भागात या शेतकऱ्याने कष्ट करून फुलवलेल्या या चार एकर क्षेत्रावरील द्राक्षबागेने अनेकांना प्रेरणा दिली आहे.
प्रतिकूल परिस्थितीतही सांगलीत द्राक्षांचे दर्जेदार उत्पादन सांगली : जिल्ह्यातील तासगाव आणि मणेराजुरी भागात द्राक्ष उत्पादन सुरू झाले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून येथील शेतकऱ्यांनी द्राक्षाचे दर्जेदार उत्पादन घेतले आहे.
मेंढापुरात पहिल्यांदाच गजबजला बाजार सोलापूर : मेंढापूर (ता. पंढरपूर) येथील श्री दुधेश्वर प्रशालेतर्फे ११ जानेवारीला भरवण्यात आलेल्या ‘बाजार डे’ला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या बाजारात अवघ्या तीनच तासांत सुमारे ७० हजारांची उलाढाल झाली.
मेंढापूरच्या यात्रेत चांगल्या पावसाचे भाकीत सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मेंढापूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल बिरुदेवाची यात्रा नुकतीच उत्साहात पार पडली. धनगरी ओव्या व तलवारीची परज पाहण्यासाठी भाविकांनी या वेळी मोठी गर्दी केली होती. ‘विठ्ठल बिरुदेवाचं चांगभलं’च्या गजराने आसमंत दणाणून गेला होता. या वेळी पावसाची भाकणूक करण्याची परंपरा असून,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language